शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ, जमीन - करण्यासाठी आणि खरेदी-विक्रीसाठी, शेती विषयक आधुनिक उपकरणे व अवजारे, सेंद्रिय उत्पादने, रोजचा बाजारभाव, नवीन व्यापार कायदे, चालू हवामान,शेतीसाठी लागणारे मजूर मिळवून देण्यासाठी, माहिती देण्यासाठी व मदत करण्यासाठी बनवलेल्या पोर्टल वरती आपले स्वागत आहे.
शेतकऱ्यांना Agriz पोर्टल वरील विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी त्यांना सर्वप्रथम त्यांची नोंदणी करावी लागेल जे कि ते स्वतः करू शकतात किंवा संपर्क केंद्रातून करून घेऊ शकतात.
राज्यातील तळा गाळातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या योजना पोहचणे, हे आमच्या वेबसाइट चे मुख्य उद्दिष्ट आहे. जेणेकरून आपला एकही शेतकरी बांधव यांच्या लाभापासून वंचित राहणार नाही. यासाठीच आमचे प्रयत्न चालू आहेत. तसेच मंत्री मंडळातील शेती विषयक निर्णय शेतकऱ्यांना माहित असणे आवश्यक आहे, हे आम्ही जाणतो आणि त्यांना समजेल अश्याच भाषेत ही माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत.

शेवटी एवढाच ध्यास आहे की, महाराष्ट्र तसेच इतर राज्यातील कोणताही शेतकरी या माहितीपासून वंचित राहू नये. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आपली शेती आधुनिक करून दर्जेदार उत्पन्न काढावे, हीच आमची मनापासून इच्छा आहे. शेवटी शेतकऱ्याचा विकास झाला, तरच देशाचा विकास संभव आहे. या वेबसाइट मधील सर्व महिती ही इतर वेबसाइट चा अभ्यास करून सर्व माहिती एकत्र केलेली आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना अपूर्ण माहिती मिळू नये. एखादी योजना आमच्या वेबसाइट वर तुम्ही पाहिली तर तुम्हाला त्या योजने संदर्भात अधिक माहिती शोधण्यासाठी दुसरीकडे जाण्याची काहीही गरज नाही अशी परिपूर्ण माहिती आम्ही उपलब्ध करून देत आहोत. तेही आपल्या शेतकरी मित्रांना समजेल अश्या सध्या आणि सरळ भाषेत. गरीब आणि कष्टाळू शेतकऱ्यांचा जोपर्यंत विकास होत नाही, तोवर आमचे काम चालूच असणार आहे.
copyright © 2023 all right reserved.
Your order has been successfully processed! Please direct any questions you have to the store owner. Thanks for shopping
continue browsing